Three arrested, including Wafgaon's  former sarpanch, for helping Bandal in a fraud case
Three arrested, including Wafgaon's former sarpanch, for helping Bandal in a fraud case 
मुख्य बातम्या मोबाईल

बांदलांना मदत करणे वाफगावच्या माजी सरपंचाच्या आले अंगलट

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात अटक असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal ) यांना या गैरव्यवहारात साथ देणााऱ्या आणखी तीन संशयित आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये खेड तालुक्याच्या वाफगाव (Wafgaon) येथील माजी सरपंचाचा (former sarpanch) समावेश आहे, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. 

दरम्यान, या फसवणूक प्रकरणात मंगलदास बांदल यांना कुलमुखत्यार पत्र करताना सहाय्य करणे हे वाफगावच्या माजी सरपंचांसह तिघांना चांगले अंगलट आले आहे. कुलमुखत्यार पत्रात या तीनही संशयित आरोपींचा समावेश असल्याने त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा : मी सभापती, आमदारही आमचाच, एक-दोन मर्डर सहज खपवू शकतो
 
फिर्यादी दत्तात्रेय रावसाहेब मांढरे यांच्या तक्रारीवरून मागील महिन्यात माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात बांदलांसह आणखी दोघे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणी आता संजय शिवाजीराव शितोळे-सरकार (रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर), विकास नामदेव कराळे (रा. वाफगाव, ता. खेड) आणि गोविंद शंकर झगडे (रा. धानोरे, ता. शिरूर) यांना शिक्रापूर पोलिसांनी सोमवारी (ता. २८ जून) अटक केली आहे. 

दरम्यान, विकास कराळे हे वाफगाव (ता. खेड) येथील माजी सरपंच असून संजय शितोळे-सरकार हे पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील बडे प्रस्थ असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. मांढरे यांच्या फसवणूक प्रकरणात बनावट कुलमुखत्यार पत्रात या तीनही आरोपींचा सहभाग शिक्रापूर पोलिसांनी निष्पन्न केला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे मूळ १ कोटी २५ लाखांच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने वाढलेल्या २ कोटी ५० लाख रुपये रकमेच्या थकबाकीवरून मांढरे यांनी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणात आता अटक आरोपींची संख्या सहावर पोचली आहे. याबाबतची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT