Three persons arrested from Baramati in Army exam paper leak
Three persons arrested from Baramati in Army exam paper leak 
मुख्य बातम्या मोबाईल

सैन्यभरतीच्या परीक्षेचा पेपर फुटला...बारामतीतून तिघांना अटक

वृत्तसंस्था

पुणे : लष्कराकडून देशभरात घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सैन्यभरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही परीक्षाही रद्द करण्यात आली असून पेपरफुटीप्रकरणाचे कनेक्शन बारामतीपर्यंत पोहचले आहे. बारामतीतून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लष्कराकडून सैन्यभरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने लष्कराने तिघांना ताब्यात घेतले. ''भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने आणि भ्रष्टाचारविरहित पार पाडण्यासाठी भारतीय लष्कर कटिबध्द आहे,'' असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून लष्कराने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लष्कराच्या पेपरफुटीमध्ये बारामती कनेक्शन समोर आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT