ramesh adaskar
ramesh adaskar 
मुख्य बातम्या मोबाईल

आजचा वाढदिवस : रमेशराव आडसकर (ज्येष्ठ नेते भाजप, अध्यक्ष, अंबा सहकारी साखर कारखाना)

सरकारनामा ब्युरो

हाबाडा फेम म्हणून राज्यभर ओळख असलेल्या दिवंगत लोकनेते बाबुराव आडसकर यांचा राजकीय वारसा त्यांचे धाकटे चिरंजीव रमेशराव आडसकर सांभाळत आहेत. केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, धारूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबा सहकारी साखर कारखाना, केज पंचायत समिती, छत्रपती शिक्षण संस्था, योगेश्वरी सहकारी सुतगीरणी आशा विविध सहकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आडसकर यांचे केज व माजलगाव मतदार संघात कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आहे. 

राजकीय डावपेचांत माहीर  असलेल्या रमेश आडसकर यांनी जिल्हा परिषद आखाड्यात अनेकदा धक्कादायक डाव टाकून विरोधकांना नामोहरम केले आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले रमेश आडसकर यांनी माजलगाव मतदार संघातून निवडणुक लढविली. मात्र, त्यांचा काठावर पराभव झाला. सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT