Transgender Candidate Anjali Patil won Election from Jalgaon
Transgender Candidate Anjali Patil won Election from Jalgaon 
मुख्य बातम्या मोबाईल

जळगाव जिल्ह्यातील भादलीतून तृतीयपंथी अंजली पाटील विजयी

कैलास शिंदे

जळगाव  : जळगाव जिल्हयातील भादली बुद्रूक  ग्रामपंचायत निवडणूकीत तृतीयपंथी उमेदवार  अंजली पाटील विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या  त्या जिल्ह्यात  पहिल्या तृतीयपंधी  लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत.

भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (गुरू संजना जान) यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज नाकारला होता. त्यामुळे  त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.  

न्यायालयाने त्यांना महिला वर्गवारीत अर्ज भरण्याची मंजूरी दिली. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित झाली. यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जोरदार प्रचार केला.

आज सकाळी झालेल्या मतमोजणीतून वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. त्यांना तब्बल ५६० मते पडली आहेत. त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. अंजली पाटील यांचा मागील पंचवार्षिक निवडूणकीत ११ मतांनी पराभव झाला होता.  भादली ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होताना सर्वांनाच याबाबत उत्सूकता हेाती. अखेर त्या विजयी झाल्या. त्याच्या समर्थकांनी एकच जल्लोश केला. भादली गावात त्याची प्रचंड मिरवणूक काढण्यात  आली.

अजंली पाटील विजयानंतर ‘सरकारनामा’शी बोलतांना म्हणाल्या, की जनतेने आपल्या उमेदवारीवर विश्‍वास ठेवून आपल्याला निवडून दिले आहे. आपण जनतेचा हा विश्‍वास सार्थ ठरवित विकासाचे कामे करणार आहोत.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT