twenty seven thousand corona positive patients in maharashtra state
twenty seven thousand corona positive patients in maharashtra state 
मुख्य बातम्या मोबाईल

राज्यात आज १६०२ नविन कोरोना रुग्णांचे निदान

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७ हजार ५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ६८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०१९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५,औरंगाबाद शहरात २, पनवेलमध्ये १ तर
कल्याण डोंबिवलीमध्ये १ मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ पुरुष तर १३ महिला आहेत.  आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २०  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या
वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १६,७३८ (६२१)
ठाणे: १६६ (३) 
ठाणे मनपा: १२१५ (११)
नवी मुंबई मनपा: १११३ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४२४ (४)
उल्हासनगर मनपा: ८२
भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४८ (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: २९५ (११)
रायगड: १६६ (२)
पनवेल मनपा: १६१ (९)
ठाणे मंडळ
एकूण: २०,६८९ (६८१)
नाशिक: ९८
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा:  ६४९ (३४)
अहमदनगर: ५५ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: ९ (२)
धुळे मनपा: ६२(४)
जळगाव: १७१ (२२)
जळगाव मनपा: ५२ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: ११९३ (७१)
पुणे: १८२ (५)
पुणे मनपा: २९७७ (१६६)
पिंपरी चिंचवड
मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३३५ (२०)
सातारा: १२५ (२)
पुणे मंडळ एकूण: ३७८३ (१९८)
कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३६
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८३ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १५८ (५)
औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६२१ (१९)
जालना: २०
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७९९ (२०)
लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९४ (५)
अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १९० (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८७ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४२८ (२६)
नागपूर: २
नागपूर मनपा: ३२९ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ
एकूण: ३३९ (३)
इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण:  २७ हजार ५२४  (१०१९)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT