Two Constables from Satara police Decided not to Take leave in Lock Down Days
Two Constables from Satara police Decided not to Take leave in Lock Down Days 
मुख्य बातम्या मोबाईल

....आणि खुद्द गृहमंत्र्यांनी घेतली 'त्या' दोन काँन्स्टेबलच्या कामाची दखल!

संपत मोरे

पुणे : सातारा येथील निलेश दयाळ आणि सागर गोगावले या दोन पोलिसांनी 'आम्ही कोरोनाच्या काळात सुट्टी घेणार नाही."असे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दिले. या दोन पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली असून ट्विटवरून त्यांचे कौतुक केले आहे. याबाबत निलेश दयाळ यांनी, 'आमच्यासारख्या पोलीस कॉन्स्टेबलची दखल गृहमंत्र्यांनी घेतल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे.काम करण्यास हुरूप आला आहे." असे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

सातारा येथील शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले निलेश दयाळ आणि सागर गोगावले यांनी कोरोनाच्या पाश्वभूमीवर एकही सुट्टी न घेण्याचा निर्धार केला. तसे पत्र त्यानी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दिले. हे पत्र सामाजिक कार्यकर्ते शिवराम कोंडीबा ठवरे यांनी ट्वीट केले होते. या ट्वीटची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. त्यांनी या दोन पोलिसांचे कौतुक केले.

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तावर असणाऱ्या निलेश महेंद्र दयाळ आणि सागर दिलीप गोगावले यांनी कोरोना नियंत्रणात येईपर्यंत एकही सुट्टी घेणार नसल्याचा निर्धार केला आहे. या दोघांची कर्तव्याप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे,' अशा शब्दांमध्ये गृहमंत्र्यांनी दोन्ही पोलिसांचे कौतुक केले आहे.

दरम्यान 'सरकारनामा'ने निलेश दयाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या अनेक योद्ध्यांच्या बातम्या आम्ही वाचतोय. देश संकटात असताना जीवावर उदार होऊन काम करणारे लोक बघतोय.आम्ही काय करू शकतो याचा विचार केल्यावर आपण सुट्टी न घेता काम करू शकतो असे वाटलं. मग आम्ही तसा निश्चय केला आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना आमचा निर्णय कळवला. त्याची दखल राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली यामुळे आम्हाला हुरूप आला आहे. आता कोरोनाचे संकट आहे तोवर एकही सुट्टी न घेता आम्ही या लढाईत आमचे  योगदान देणार आहोत."
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT