Udayanraje Demands Appology from Kamalnath
Udayanraje Demands Appology from Kamalnath 
मुख्य बातम्या मोबाईल

मध्यप्रदेशातील तो प्रकार निंदनीय, कमलनाथ यांनी माफी मागावी : उदयनराजे भोसले

सरकारनामा ब्युरो

सातारा  : मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जेसीबीच्या साहाय्याने  शिवरायांचे स्मारक काढण्यात आले.  हा प्रकार अतिशय संतापजनक आणि निंदनीय असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागावी, अशी मागणी शिवरायांचे तेरावे वंशज व माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. याबाबत उदयनराजे यांनी ट्विटर वरून मध्यप्रदेशातील प्रकाराचा निषेध करून आपली तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातील शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला. पुतळा हटवण्यास असलेला विरोध लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने रातोरात बुल्डोझर चालवून चौथरा उद्ध्वस्त केला. त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आणि स्थानिक युवकांनी नागपूर-छिंदवाडा महामार्ग काहीकाळ अडवून धरला होता.

काँग्रेसच्या राज्यात सावरकरांनंतर आता शिवरायांचा अवमान होत आहे असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा व्हीडीओ शेअर केला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद मध्य प्रदेशात चांगलाच पेटला आहे. याचे प्रतिसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. याप्रकाराबाबत शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. शिवरायांचे स्मारक काढण्याचा मध्यप्रदेशातील तो प्रकार अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व शिवभक्तांची माफी मागावी. ‘स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी  हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार मानतो.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT