Udayanraje went to meet Amit Shah
Udayanraje went to meet Amit Shah 
मुख्य बातम्या मोबाईल

उदयनराजे निघाले अमित शहांच्या भेटीला 

सरकारनामा ब्युरो

सातारा : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले पुढच्या आठवड्यात दिल्लीला गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. या भेटीत त्यांना राज्यसभेवर घेण्यासोबतच मंत्रीपद देण्याबाबत चर्चा होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शांत असलेले उदयनराजे यानिमित्ताने देशाच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्‍यता आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर चार महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पोटनिवडणुक लागली. पण त्यांना श्रीनिवास पाटलांकडून पराभव पत्करावा लागला. उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी दिग्गज नेते जिल्ह्यात येऊन गेले, पण उदयनराजेचा पराभव झाला. या पराभवाची भरपाई करण्याचे आश्‍वासन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजे भोसले यांना देशाच्या राजकारणात सक्रिय राहावेत, म्हणून त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री पद देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, गेल्या दोन अडीच महिन्यांपासून पुन्हा ही चर्चा मागे पडली होती. आता पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांत चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात उदयनराजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT