2rt_3.jpg
2rt_3.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

निर्बंध कमी करण्याबाबत दोन दिवसांनी मुख्यमंत्री निर्णय घेणार

सरकारनामा ब्युरो

जालना : राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे, त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करीत आहे. हा अहवाल दोन दिवसांनी आल्यानंतर निर्बंध कमी करायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray घेतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी सांगितलं. टोपे यांच्या हस्ते जालन्यात १०० खाटाच्या कोविड रुग्णालयाच उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सध्या राज्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून राज्यात पूर्ण क्षमेतेने लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे, मात्र, केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्यानं लसीकरण करण्यात अडथळा येत आहे. लसींचा केंद्राकडून चांगल्या प्रमाणात पुरवठा झाल्यास राज्यात ७० ते ८० टक्के लसीकरण पूर्ण होऊन निर्बंध कमी करण्यास मदत होईल, असंही टोपे म्हणाले.

पूरग्रस्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या टीम पाठवण्यात आल्या आहेत. साथीचे आजार पसरवू नये, म्हणून प्रतिबंधक उपाय करण्याचे आदेश देण्यात आले असून खाजगी हॉस्पिटलमध्ये सीरियस रूग्णांसाठी 50 टक्के खाटा राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. 

फ्रंट लाईन वर्करमध्ये 35 टक्के लसीकरण झालं असून फ्रंट लाईन वर्कर्सनी सर्वात अगोदर लसीकरण करून घ्यावं, जेणेकरून तिसऱ्या लाटेत या कर्मचाऱ्यांना आणखी काम करता येईल असं सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांनी तातडीने लसीकरण करून घेण्याची सूचना टोपे यांनी केली.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची आयपँक टीम नजरकैदेत
नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमचा त्रिपुरा पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.प्रशांत किशोर यांच्या आयपँक कंपनीच्या २० ते २२ कर्मचारी हे आगरतळा येथील एका हाँटेलमध्ये उतरले आहेत. तेथे त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT