udhhav thackrey oath
udhhav thackrey oath  
मुख्य बातम्या मोबाईल

1 डिसेंबरला शिवतिर्थावर उद्धव ठाकरेंचा शपथविधी: शरद पवार

सरकारनामा ब्युरो

पुणे: महाराष्ट्र विकास आघाडीच्या विधीमंडळ पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिवतिर्थावर होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे
अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 

आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार स्थापनेसाठी शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक रात्री मुंबईत झाली. या बैठकीत आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली. त्यानंतर बोलताना पवार म्हणाले, आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांची कर्णधारपदी निवड केली आहे. आता बैठक संपल्यावर तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांकडे जावून सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर राज्यपाल उद्धव यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण देतील. उद्धव यांचा शपथविधी 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिवतिर्थावर होईल. हा सोहळा ऐतिहासिक होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT