मुख्य बातम्या मोबाईल

रामराजे, लक्षात ठेवा माझ्यासारखा वाईट कोणी नाही : उदयनराजे 

सरकारनामा ब्युरो

सातारा : मी कुणाच्या आधारावर नाही. स्वतःच्या हिमतीवर आहे. मी कॉलर उडवतो, यापुढेही उडवत राहणार. तुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय. माझ्यासारखा कोणी वाईट नाही. माझ्या कॉलरवर बोलायचे असेल तर समोर येऊन बोला, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक -निंबाळकर यांचे नाव न घेता दिला. 

उदयनराजे म्हणाले, मी केलेली नौटंकी दिसते. लावणी म्हणतो, या पुढेही हे करतच राहणार. मी नेहमीच खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझ्या वागण्यात बदल होणार नाही. मी तत्व सोडून बोलत नाही. माझ्या स्वभावात बदल करू शकत नाही. मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो मै खुद की बी नही सूनता....असाही टोला त्यांनी लगावला. 

सातारा राजधानी महोत्सव या कार्यक्रमातून जिल्हातील विविध क्षेत्रातील मुलांना वाव मिळाला पाहिजे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे. याला कोणी राजकीय स्वरूप देऊ नये. अजूनही असा कोणीही प्रयत्न केला नाही. मुलाच्या भवितव्यासाठी काम करत राहणार आहे, असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT