मुख्य बातम्या मोबाईल

उदयनराजे भोसले यांचा 90 हजारांनी पराभव

सरकारनामा ब्युरो

सातारा : उदयनराजे भोसले यांना सातारच्या जनतेने नाकारत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना 90 हजारावर मतांनी विजयी केले. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना साताऱ्यातील जनतेने चक्क नाकारले.  

लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यांच्या समर्थकांचे लाखोंच्या मताधिक्याचे आकडे राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भुईसपाट केले आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार श्रीनिवास पाटील यांनी 90 हजार मतांची आघाडी घेतली होती. उदयनराजेंचा पराभव भाजप आणि त्यांच्या समर्थकांसाठी धक्कादायक आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा साताऱ्यात झाली होती, यावेळी उदयनराजे यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर साताऱ्यात धो धो पावसात शरद पवार यांची जाहीर सभा झाली होती. यामध्ये श्री. पवार यांनी मागील निवडणुकीत माझ्याकडून झालेली चूक सातारकरांनी या निवडणुकीत सुधारावी, असे आवाहन केले होते. या हाकेला साद देत साताऱ्यातील जनतेने पवारांचा शब्द पळत श्रीनिवास पाटील यांना विजयी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT