Suraj Mandhare
Suraj Mandhare 
मुख्य बातम्या मोबाईल

बंधने शिथिल मात्र, लॅाकडाउनची स्थिती येऊ देऊ नका

सरकारनामा ब्युरो

नाशिक :सोमवारपासून नाशिक शहर व जिल्ह्यात लॅाकडाउनची प्रक्रीया काही प्रमाणात शिथिल केली जाणार आहे. (Unlockdown process from tommarow in Nashik) मात्र परिस्थिती अद्यापही अत्यंत गंभीर आहे. (Situation still not safe now) त्यामुळे सर्व नियम, अटींचे पालन करावे. आपण व सर्व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी, अन्यथा पुन्हा लॅाकडाउन करावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी दिला आहे.   

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, उद्यापासून आपण अनलॅाकडाउची प्रक्रीया सुरु करीत आहोत. यासंदर्भात आपल्यापैकी अनेकांना कधी एकदा आपला नैसर्गिक दिनक्रम सुरु करतो. सर्व व्यावसाय, व्यापार सुरु करतो असे वाटते आहे. उद्यापासून दुकाने तसेच विविध व्यावसायिक संस्थांना मोकळीक मिळणार आहे. याचा अनेकांना दिलासा मिळेल. विविध घटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र असे असले तरीही आपल्याला अधिक गांभिर्याने, काळजीपूर्वक या स्थितीला सामोरे जात विविध प्रकारची दक्षता घ्यावी लागणार आहे. यापूर्वी पहिल्या कोरोनाच्या लाटेनंतर आपण जेव्हा फेब्रुवारी महिन्यात बंधने शिथील केली, तेव्हा जिल्ह्यात एक हजार रुग्ण होते. तेव्हा असे वाटत होते, की आपण यशस्वीपणे करोनावर मात केली आहे. आपण कोरोनावर यशस्वी मात केली. आता आपण कोरोना योद्धे म्हणून मिरवतो, असे तेव्हा वाटत होते. आपल्याला वाटले ही शेवटची ऑर्डर असेल. मात्र सगळ्यांचा हिरमोड झाला.

ते म्हणाले, त्यावेळी विविध तज्ञ, डॅाक्टर्स तसेच वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळी आपल्याला दुसरी लाट येईल. ती अत्यंत भयानक असेल. पहिल्या लाटेनंतर अशा अनेक सूचना येत होत्या, त्यात अनेक समस्या निर्माण होतील. औषधे मिळणार नाही. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवेल. रुग्णालयांत जागा मिळणरा नाही, असे सुचकपणे सांगत होते. मात्र या लाटेत व्यावसायाचे नुकसान झाले. आपल्या अनेक आप्त, स्वकीयांना गमावले. त्यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. मात्र प्रशासनाने आपली सर्व क्षमता पणाला लावून तयारी केली. अनलॅाकडाउनची प्रक्रीया सुरु केली. बंधने शिथिल केली. तेव्हा जिल्ह्यात केवळ एक हजार रुग्ण होते. मात्र दुसरी लाट अधिक गंभीर व संकटे घेऊन आली. गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या चाळीस हजारांवर पोहोचली.  थोडक्यात रुग्णांची संख्या चाळीसपट वाढली. त्यामुळे ही संख्या गांभिर्य स्पष्ट करते. दुसरी लाट अधिक घातक होती. जर दोन महिन्यात एक हजारचे चाळीस हजार होऊ शकतात तर या सात हजार रुग्णांचे किती हजार होऊ शकतात, याचे गांभिर्य आपण घेतले पाहिजे. त्याचा आपल्यालाच अंदाज करावा लागेल. त्यामुळे पहिल्या लाटेतून आपण काही तरी शिकले पाहिजे. त्यापासून धडा घेतला पाहिजे अन्यथा निसर्ग आपल्याला माफ करणार नाही. 

आज सगळे तज्ञ चिंतातूर आहेत. चार ते साडेचार लाख लोक जे कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांची थोडी तरी रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. ते सर्व घरांत आहेत. त्यामुळे आपण बाहेर फिरून घरी आजार घेऊन जाऊ नयेत. त्यामुळेच शिथीलता आणताना काही दक्षता देखील आपण घेतली आहे.

जवळपास पंचवीस प्रकारच्या अॅक्टीव्हिटी आपण सुरु करतो आहोत. मात्र प्रत्येक ठिकाणी काही तरी एक अट टाकली आहे. त्यामुळे सर्व नागरिक, व्यापारी व घटकांनी व्यवस्था पुर्ववत सुरु करण्याकडे जेव्हढे लक्ष देत आहात, तेव्हढेच त्या बंधनांकडे देखील कालजीपूर्वक व काटेकोरपणे त्याचे पालन करा. त्या अटींच्या आधार घेउन आपण हे पाऊल पुढे टाकतो आहे. केवळ तलवार घेऊ युद्ध जिंकता येत नाही. आपल्या ढाल देखील आवश्यक असते. पुन्हा खुप घाई करून निष्काळजीपणा केला तर कदाचीत पुन्हा लवकरच पुन्हा लॅाकडाउन करावे लागेल. आजही परिस्थिती गंभीर आहे. रोज चाळीस-पन्नास नागरिकांचा मृत्यू होत आहे. तेव्हा दक्षता घेऊन वर्तन करावे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT