Urmila Matondkar
Urmila Matondkar 
मुख्य बातम्या मोबाईल

उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांकडून फोन गेल्याची चर्चा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत जाणार असून त्यांचे नांव शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त कोट्यासाठी पाठविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. गेल्या काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर सामाजिक विषयांवर खूप आक्रमक भूमीका मांडत आहेत. महाराष्ट्र, मुंबई यावरही त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेण्याचा विचार केला जाऊ शकतो. दरम्यान उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यासंदर्भात मी देखील चर्चा ऐकली आहे. हा निर्णय मंत्रीमंडळ घेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रीमंडळाने निर्णयाचे अधिकार दिले आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, मुख्यमंत्री विधानपरिषदेवरील  राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नांदेडचे धनगर नेते यशपाल भिंगे भाजपमधून नुकताच पक्ष प्रवेश केलेले एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी आणि गायक आनंद शिंदे यांची चार नावे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पक्षाकडून याबाबत अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष चार चार नावांचा बंद लिफाफा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध लक्षात घेता ही नावे मान्य केली जातील काय याबाबत शंका आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT