Uttarakhand BJP MLA Umesh Sharma warns state party 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपमध्ये खदखद; आमदारानं दिल्ली गाठत केली तक्रार...ज्येष्ठ नेत्यांचंही समर्थन

मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षातील एक गट माझ्यासोबत नव्हता, असं या आमदारानं म्हटलं आहे.

वृत्तसंस्था

रायपूर : उत्तराखंड भाजपमधील खदखद अजूनही शांत झालेली नाही. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील काही नेत्यांकडून सन्मान केला जात असल्याचे सांगत एका आमदाराने थेट दिल्ली गाठत नेतृत्वाकडं तक्रार केली. त्यांना कॅबिनेट मंत्री व एका ज्येष्ठ नेत्यानंही समर्थन दिल्यानं भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून आलं आहे. (Uttarakhand BJP MLA Umesh Sharma warns state party)

भाजपचे आमदार उमेश शर्मा काऊ यांनी ही तक्रार केली आहे. मालदेवता येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान कॅबिनेट मंत्री डॉ. धनसिंह रावत यांच्या उपस्थितीत शर्मा व एका नेत्यादरम्यान मोठा वाद झाला होता. पक्षानं या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण त्यानंतरही शर्मा यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्वाला याबाबतची माहिती दिली आहे. माझ्या मनातील खदखद नेत्यांना सांगितली, असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश महामंत्र्यांना मागील अनेक दिवसांपासून माझे म्हणणे सांगत आहे. पण तिथे काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे मला दिल्लीत जावं लागल्याचं शर्मा यांनी स्पष्ट केलं. यावर दिल्लीतूनही काही निर्णय न झाल्यास पक्षातील काही आमदारांचा समावेश असलेल्या पक्षाबाहेरील संघटनेत निर्णय घेऊ, असा थेट इशाराही शर्मा यांनी दिला. 

मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षातील एक गट माझ्यासोबत नव्हता. मागील चार वर्ष तेच घडलं आहे. तर सहा महिन्यांपासून माझ्याविरोधात रोज बैठका होत असल्याची खदखद शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, शर्मा यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचं कौतुक केलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही शर्मा यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं. तसेच त्यांची नाराजी नसून आम्ही एकत्र बसून मार्ग काढू, असंही ते म्हणाले.

सतपाल महाराजांकडून समर्थन

उमेश शर्मा काऊ यांचे कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांनी समर्थन केलं आहे. तसेच राज्यातील मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत असलेले सतपाल महाराज यांनीही शर्मा यांचं समर्थन केल्यानं हा मुद्दा भाजपमध्ये चांगलाच गाजू लागला आहे. शर्मा हे पक्षातील सन्मानित नेते आमदार आहेत. त्यांच्यासोबत अशाप्रकारचं वागणं योग्य नाही. मी स्वत: हा मुद्दा पक्षीय पातळीवर उचलून धरेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT