Varkari
Varkari  
मुख्य बातम्या मोबाईल

पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी प्रयत्न करणार

सरकारनामा ब्युरो

नाशिक : दर वर्षी निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरला आषाढी एकादशीला पायी जात असते. (Every year Sent Nivruttinath Palkhi goes by road to Pandharpur) गतवर्षीपासून कोरोना महामारीने या वारीत खंड पडला आहे. (This yaer that Tradition break due to covid lockdown restricions) गेल्या वर्षी शिवशाही बसने मोजक्या वारकऱ्यांनी ही वारी केली. अगदी बस निघण्याच्या वेळेपर्यंत वादविवाद सुरू होते. या वर्षी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याची भावना वारकऱ्यांनी (Varkari Deemands) व्यक्त केली.

ज्ञानेश्वरांचे गुरू व ज्येष्ठ बंधू निवृत्तिनाथ यांच्या पालखीबाबतही दरवेळी भेदभाव केला जातो, अशी भाविकांची भावना आहे.या वर्षी २० जुलै वारीचा मुख्य दिवस आहे. १९ ला पन्नास मानकरी व वारकरी घेऊन दोन बसने जाऊन ही वारी संपन्न केली होणार आहे. तत्पूर्वी २४ जूनला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा गतवर्षीच्या धर्तीवर प्रातिनिधिक स्वरुपात समाधी मंदिराच्या आवारात होईल. तेथे रोज पंढरपूरला वारीसाठी जाण्यासाठी वाटेत सकाळ व सायंकाळी होणारी पूजा व आरती होईल, असे पूजक जयंत गोसावी यांनी सांगितले. या मंदिराचा कारभार सध्या प्रशासक पाहत असून, धर्मादाय आयुक्त कृष्णा सोनवणे, ॲड. भाऊसाहेब गंभीरे, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे व मुख्याधिकारी संजय जाधव पाहात आहेत.

वारी प्रस्थान करण्यासाठी व्यवस्था व त्यातील व्यक्तींच्या सहभागाची यादी निश्चित करण्यासाठी लवकरच बैठक होईल व वारकरी भक्तांची भक्तीची वारी होईल, ती हौशी लोकांची नसेल, असे ॲड. गंभीरे यांनी सांगितले.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT