Sarkarnama Banner - 2021-08-02T095322.163.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-02T095322.163.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

सोळा कोटींच्या इंजेक्शनानंतरही अकरा महिन्याच्या वेदिकाची मृत्यूशी झूंज अपयशी  

सरकारनामा ब्युरो

पुणे  : स्पायनल मस्क्युलर Spinal muscular ॲट्रॉफी टाईप- वन या दुर्मिळ आजाराशी झुंज देत असलेल्या अकरा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. भोसरी येथील  वेदिका शिंदे हीला Vedika Shinde स्पायनल मस्क्लुअर अॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजारा झाला होता. या आजारावर मात करण्यासाठी वेदिकाला १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज होती. लोकवर्गणीतून सोळा कोटी रुपये जमवून तिला इंजेक्शन देण्यात आले होते. 

अमेरिकेमधून ते इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्यावर ६ कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते. १५ जून दिवशी वेदिकाला इंजेक्शन देण्यात आले होते.
 वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला होता. इतक्या प्रयत्नानंतरही वेदिकाची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आहे.  रविवारी संध्याकाळी खेळत असताना वेदिकाला श्वास घेण्यास अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वेदिकावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर अमोल कोल्हे यांनी एक ट्वीटही केलं होतं. ''१६ कोटींचे इंजेक्शन वेदिका हिला दिल्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या आई वडिलांसह आम्हा सर्वांच्या कष्टाचं आज चीज झालं याचं खरं तर मनाला समाधान वाटलं,'' असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं होतं. वेदिकाच्या निधनानंतर राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही ; दरेकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. ''कोणत्याही पक्षाच बालेकिला कायम नसतो. निवडणुका येतील म्हणून आम्ही बूथ बांधणी सुरु केलेली नाही. आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही,'' अशी निशाणा दरेकर यांनी नाव ने घेता शिवसेनेवर केला आहे. 
 Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT