2Sarkarnama_20Banner_20_202021_06_04T093102.820.jpg
2Sarkarnama_20Banner_20_202021_06_04T093102.820.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

विजय मल्ल्याला लंडन कोर्टाचा दणका ; दिवाळखोर घोषीत

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली :  हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडविणारा उद्योगपती विजय मल्ल्याला Vijay Mallya लंडनच्या Court of Englandउच्च न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाने मल्ल्याला दिवाळखोर म्हणून घोषित केले आहे. या निकालामुळे मल्ल्याची  संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

भारतीय स्टेट बॅंकेच्या नेतृत्वाखाली त्याचा विरोधात खटका दाखल करण्यात आला होता. हा खटला स्टेट बॅकेने जिंकला आहे. बॅकांच्या कंसोर्टियमने याबाबतची मागणी लंडनच्या उच्च न्यायालयात केली होती. भारतीय बॅकाच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने बॅकांच्या बाजूने हा निकाला दिला आहे. या निकालासोबत मल्ल्याला दिवाळखोर म्हणून न्यायालयाने घोषित केलं आहे. 

न्यायालयात भारतीय बॅंकांची बाजू टीएलटी एलएलपी या कायदेशीर फर्मने आणि बॅरिस्टर मार्सिया शेकरडेमियनने मांडली होती. ६५ वर्षांच्या मल्ल्या इतके दिवस इंग्लंडमध्ये जामिनावर राहत होता. यापुढेही जोपर्यत त्याच्या प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यत तो जामिनावरच राहणार आहे. दरम्यान विजय मल्ल्याचा वकील फिलिप मार्शलने भारतीय न्यायालयात सुरू असलेल्या सुनावण्यांवर निर्णय येईपर्यत या आदेशाला स्थगित ठेवण्याची मागणी केली होती.

हेही वाचा : दोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील!
जळगाव  :  भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी चिपळूण पूरग्रस्तांची पाहणी केली,आज ते कोल्हापूर भागातील पूरग्रस्ताना भेटी देणार आहेत त्यावर खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT