Vikas Dubey was tipped off from police Station about the Raid
Vikas Dubey was tipped off from police Station about the Raid 
मुख्य बातम्या मोबाईल

धक्कादायक : विकास दुबेला पोलिस ठाण्यातूनच मिळाली होती छाप्याची टीप!

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिसांची हत्या करणारा गुन्हेगार विकास दुबेला पोलिसांचा छापा पडणार ही माहिती खुद्द पोलिस ठाण्यातूनच फोनद्वारे मिळाल्याची धक्कादायक माहिती त्याच्या साथीदाराने पोलिसांना दिली आहे. दया शंकर अग्निहोत्री असे या साथीदाराचे नाव असून त्याला आज सकाळी पकडण्यात आले आहे. 

विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना कानपूर येथे २ जुलैला रात्री घडली होती. यात आठ पोलीस ठार झाले असून, विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल ६०  गुन्हे दाखल आहेत. दुबेचा जो साथीदार आज पकडला गेला, त्याच्यावर २५ हजार रुपयांचे ईनाम लावण्यात आले होते. 

आज सकाळी पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी उलट गोळीबार करुन त्याला निःशस्त्र केले व ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक बंदूक व जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिस अटक करण्यासाठी येत आहेत, ही माहिती देणारा दूरध्वनी विकास दुबेला पोलिस ठाण्यातूनच आला होता. ही टीप मिळाल्यानंतर त्याने आपले २५-३० साथीदार गोळा केले व पकडायला आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. 

दरम्यान, विकास दुबेला पकडून देणाऱ्यास किंवा त्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे ईनाम जाहीर करण्यात आले होते. दुबेने व त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांची हत्या केल्यानंतर हे ईनाम एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात येत असून बँक खालीही सील करण्यात येत आहेत. त्याच्या घराच्या परिसरातून पोलिसांनी त्याची काही वाहने जप्त केली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT