मुख्य बातम्या मोबाईल

चंद्रकांतदादांनी म्हटल्याप्रमाणे पडळकरांना पश्चात्ताप होत असावा!

सरकारनामा ब्युरो

सांगली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न 70 टक्के सोडवल्याचे गोपीचंद पडळकर सांगत आहेत, ते पुर्णपणे खोटे आहे. प्रत्यक्षात फडणवीस सरकारने आरक्षण देण्यासाठी एकही सकारात्मक पाऊल टाकलेले नाही. मात्र पडळकर हे विधानसभेचे तिकीट किंवा विधान परिषदेची आमदारकी मिळावी, म्हणून भाजपच्या सोयीचा प्रचार करत आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली. 

ढोणे म्हणाले, गोपीचंद पडळकर यांना आता फडणवीस आरक्षण देतील असे सांगून भाजपमध्ये जायचे आहे. भाजपच्या बाहेर राहून आमदार बनणे शक्य नाही, याची खात्री त्यांना झाली आहे. समाजाला ST सर्टिफिकेट मिळणार नाही मात्र आपल्याला आमदारकीचे सर्टिफिकेट मिळेल, ही त्यांची भावना आहे. कदाचित मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे पडळकरांना पश्चात्ताप झाला असावा. लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीत बोलताना चंद्रकांतदादांनी पडळकरांना भाजपने चांगली ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. पडळकरांनी ती न घेता लोकसभेला उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना पश्चात्ताप होईल, असे म्हटले होते. त्याप्रमाणे घडले असावे. पडळकरांना आता फडणवीसांनी धनगरांसाठी केलेले 'प्रचंड' काम दिसू लागले आहे. कारण त्याबदल्यात ते नवी ऑफर घेवून आले आहेत. त्यांना आता विधानसभेचे तिकीट मिळेल किंवा परिषदेची आमदारकी मिळेल. हे 'डिल' आज ना उद्या कळणारच आहे, असे ढोणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT