collage27.jpg
collage27.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

विठुरायाला  फुलांनी सजलेल्या तिरंग्याची आरास...

भारत नागणे

पंढरपूर :  प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील  विठुरायाच्या मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला  आज  विविध  फुलांनी सजलेल्या तिरंग्याची आरास करण्यात आली.  

येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विविध सण समारंभ आणि राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने नेहमीच विठ्ठल मंदिरात देवाला विविध पाना  फुलांची आणि फळांची  आरास करून सण व उत्सव  साजरे केले जातात.

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे येथील भाविक अण्णा चव्हाण यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि देवाच्या गाभाऱ्यात विविध फुलांपासून  तिरंग्याची आरास करून आपली सेवा विठुचरणी अर्पण  केली आहे.

विठुरायाच्या  गाभार्यात केसरी झेंडू, पांढरा मोगरा आणि हिरव्या तुळशीच्या पानांचा वापर करून  तिरंग्यामध्ये आकर्षक आणि मनमोहक अशी फुलांची  सजावट केली आहे.

सजावटीमुळे देवाचा गाभारा आणि मंदिर अधिक खुलून दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विठुरायाला आज पांढऱ्या आणि लाल रंगाचा पोषाख परिधान करून गळयात  तिरंग्याचे उपरणे घालण्यात आले आहे. तर रुक्मिणी मातेलाही केसरी रंगाची साडी परिधान करून तिरंग्याचे उपरणे आणि फुलांचा हार घालण्यात आला   आहे. सभा मंडप, सोळखांबी  आणि प्रवेश द्वारावर ही फुलांची सजावट करण्यात आली आहे.

यासाठी सुमारे एक टनाहून अधिक फुलांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या इतर भागात तिरंग्याची  झालर लावून मंदिर  अधिक सजवले आहे. आज साक्षात विठुराया देखील देशभक्तीने भरावल्याचे मंदिरात  भासत आहे. देवाचे हे देखणे आणि लोभस रूप पहाण्यासाठी भाविकांनी ही आज मोठी  गर्दी केली आहे.

सलग सृट्टयांमुळे पंढरीत गर्दी 
सलग सुट्ट्यांमुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या  भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होवू लागली आहे. दोन दिवसांपासून पंढरीत भाविकांची  मोठी गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने सर्व नियम पाळून भाविकांसाठी दर्शन खुले केले आहे. त्यानंतर  विना पास मुखदर्शन सुरू केल्याने भाविकांची संख्या वाढली आहे. मंदिर परिसरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले आहेत.
.....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT