We ordered 2 lakh vials of Amphotericin B but received 15 thousand says Rajesh Tope
We ordered 2 lakh vials of Amphotericin B but received 15 thousand says Rajesh Tope 
मुख्य बातम्या मोबाईल

'ब्लॅक फंगस'ला कसे रोखायचे? मागितली २ लाख इंजेक्शन मिळाली फक्त १५ हजार...

वृत्तसंस्था

मुंबई : म्युकरमायकोसीस (Black Fungus) चा धोका वाढत असतानाच त्यावरील औषधांच्या तुटवड्याचे आव्हानही सरकारसमोर उभे ठाकले आहे. या आजारावर उपचारासाठी 'अॅम्फोटेरेसिन बी' या इंजेक्शनचा वापर केला होता. पण मागील काही दिवसांत या इंजेक्शनची मागणी हजारो पटींनी वाढल्याने इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. एका रुग्णाला बरे होण्यासाठी किमान ५० इंजेक्शन लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन उपलब्ध करावी लागणार आहेत. (We ordered 2 lakh vials of Amphotericin B but received 15 thousand says Rajesh Tope)

एकट्या महाराष्ट्रामध्ये या आजाराचे दीड हजारांहून अधिक रुग्ण आहेत. जवळपास ९० जणांचा मृत्यू झाला आहे. इतर राज्यांमध्येही या आजाराचा धोका वाढत चालला आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. त्यामुळं आज केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना या आजाराची नोंद साथरोग कायद्यात करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. 

देशात दुसरी लाट येण्यापूर्वी या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत तुरळक होते. त्यामुळे देशभरात केवळ दहा हजार इंजेक्शनची मागणी होती. पण मागणी आता हजारो पटींनी वाढली आहे. महाराष्ट्राचे आयोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  महाराष्ट्र सरकारने अॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनच्या दोन लाख वायल्सची ऑर्डर दिली होती. पण केवळ १५ ते १६ हजार वायल्स मिळाल्या आहेत. इंजेक्शनची मागणी खूप वाढली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा न झाल्यास रुग्णांवर उपचार करणे कठीण होईल, असेही टोपे यांनी सांगितले. 

राज्यामध्ये जवळपास दीड हजार रुग्ण आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून या रुग्णांना इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल. इंजेक्शनसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. 

काय आहे हा आजार?

म्युकरमायकोसिस या आजाराचा संसर्ग नाक, तोंड या मार्गाने मेंदूपर्यंत होऊ शकतो. मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यावर उपचारांना एकदम मर्यादा येतात.  म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी लागणारी अनेक औषधे महाग आहेत. सध्या प्रामुख्याने कोरोनाची बाधा झालेल्या आणि रोगप्रतिकारक क्षमता दुर्बल असलेल्या अनेकांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. हा नवीन आजार नाही. पण पूर्वी या आजाराचे रुग्ण तुरळक होते. कोरोनानंतर अनेकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.

हा आजार संसर्गजन्य आजाराप्रमाणे (साथीच्या आजाराप्रमाणे) पसरण्याचा धोका डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. म्युकरमायकोसिस या आजारात अंधत्व येण्याचा धोका आहे. रुग्णाच्या जगण्याची शक्यता जेमतेम ५० टक्के एवढीच आहे. काळ्या बुरशीचा आजार असेही म्युकरमायकोसिस या आजाराला म्हणतात. यात शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना बुरशी येते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. हळू हळू ते अवयव पूर्णपणे निकामी होतात. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT