mbas31.jpg
mbas31.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

ममता बॅनर्जींना मोठा हादरा..तृणमूलचे पाच नेते भाजपमध्ये..

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला खिंडार पडत असून काही दिवसापासून अनेक नेते भाजपमध्ये सामील होत आहेत. तृणमूल काँग्रेसचे पाच नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची या पाच नेत्यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर अमित शाह यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.

राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष असे या नेत्यांची नावे आहेत. यावेळी तृणमूल काँग्रेस व सध्या भाजपात असलेले नेते मुकूल रॉय आणि भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे उपस्थित होते.  

यामुळे पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ममता बॅनर्जी यांना सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तृणमूलचे बंडखोर नेते पार्थसारथी चट्टोपाध्याय हे सुद्धा भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे."बंगालमध्ये यावेळी खूप अत्याचार होत आहे. तिकडची जनता तृणमूलला हैराण झाली आहे. बंगालच्या विकासासाठी आता भाजप काम करत आहे," असे या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पाच नेत्यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शाह आज पश्चिम बंगालचा दौरा होता. पण दिल्लीत बॉम्ब स्फोट आणि शेतकरी आंदोलनामुळे दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. 

अमित शाह यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे की तृणमूलचे माजी नेते राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला विश्वास आहे की, सोनार बांग्लासाठी भाजपाच्या लढाईला हे सर्वजण आणखी मजबूत करतील.

 Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT