Sangita Jadhav
Sangita Jadhav Sarkarnama
मुख्य बातम्या मोबाईल

नगरसेविका संगीता जाधव जेंव्हा धामण सापाशी खेळतात...

सरकारनामा ब्युरो

इंदिरानगर : साप हा बहुतांश नागरिकांच्या दृष्टीने भितीचा विषय असतो. सापाची भिती घालविण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. असाच एक प्रयोग काल येथील नगरसेविका संगीता जाधव यांनीही केला. त्यांनी सापाची भिती घालविण्यासाठी परिसरात पकडलेली धामण हाता घेऊन नागरिकांना त्याबाबत माहिती दिली.

प्रसंग असा घडला की, रविवारी चेतना नगर येथे नागरिकांना दोन आठ ते दहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापांचे झालेले दर्शन घडले. या धामणची जोडी झाडांच्या अडोसा घेऊन लपल्या होत्या. मात्र महिलांच्या नजरेस पडल्यावर मुले व महिलांनी एकच गोंगाट केला.

दाट वस्तीच्या सोसायटीत साप दिसल्याने तो चर्चेचा विषय तर ठरला. मात्र त्यापेक्षाही जास्त नगरसेविका संगीता जाधव यांनी ही धामण लीलया हाताळताना बघून नागरिक देखील आश्चर्यचकित झाले.

सायंकाळी पाचच्या सुमारास नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका जाधव यांच्या बंगल्यात आणि समोर असलेल्या सारथी सोसायटीच्या प्रांगणात आसपास खेळणाऱ्या मुलांना धामण दिसल्या या महाकाय धामण बघून मुलांनी आणि महिलांनी आरडाओरड सुरू केला. झाडांच्या फांद्यांमध्ये असलेल्या सापांच्या जवळ कुणी जाण्याचा प्रश्नच नव्हता. कुणी दूरवरून तर कुणी इमारतीच्या वरच्या मजल्याच्या खिडकीतून मोबाईल द्वारे चित्रीकरण करत होते.

दरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि नगरसेविका जाधव यांनी सर्पमित्र शामराव यांना ही माहिती दिली. ते आले आणि त्यांनी या दोन्ही सापांना पकडले. त्यानंतर सौ जाधव यांनी त्यापैकी एक धामण आपल्या हातात घेत निष्णात सर्प मित्र ज्या प्रमाणे सापाला पकडून त्याला सुरक्षित रित्या जेरबंद करण्यासाठी जी कृती करतात ती सर्व कृती करून सर्वांना चकित केले. या प्रजातीबाबत सर्पमित्र शामराव यांनी नागरिकांना इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर या सापांना त्यांनी जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपल्या सोबत नेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT