Congress
Congress  
मुख्य बातम्या मोबाईल

अर्णबला गोपनिय माहिती देणारी मोठी व्यक्ती कोण? 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी याला देशाच्या सुरक्षाविषयक संवेदनशील माहिती देणारा सरकारमधील व्यक्ती कोण आहे?. त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. मात्र केंद्र सरकार व त्यांचे मंत्री याबाबत गप्प आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेविषयी सुरु असलेला हा खेळ तातडीने थांबवला पाहिजे. यातील सरकारमधील व्यक्ती व पत्रकार अर्णब दोघांवरही तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाशिक शहर कॉंग्रेसने दिला आहे. 

यासंदर्भात कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोदर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी आणि "बार्क'चे पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्‌सऍप चॅट मधून अनेक गंभीप बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती त्यात होती. या कारवाईच्या तीन दिवस आधीच त्याची माहिती होती असे या संभाषण व चॅटींगवरुन स्पष्ट होते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी गेली. देशाच्या संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर आहे. लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली?. त्याने एअजुन कोणाला ही माहिती दिली. स्वतः अर्णबने त्याला ही माहिती दिली तो सरकारमधील मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. अर्णचे हे वर्तन आणि कृत्य ऑफिशीयल ऍक्‍ट 1923, कलम 5 नुसार कार्यालयीन गोपनियतेचा भंग करणारे आहे. त्याचबरोबर हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, अर्णब याने व त्याच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली आहेत. दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वेन्सी बेकायदेशीरपणे वापरुन प्रसार भारतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केले आहे. या वाहिनीने दूरदर्शनला पैसे न देता त्यांच्या फ्रिक्वेन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी करण्याची गरज आहे. दूरदर्शन माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी त्यावर काहीही कारवाई केलेली नाही, असे त्यांच्या संभाषणातून दिसते. याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला पाठींबा आहे. जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्णब गोस्वामी विरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही? त्यामुळे या प्रकरणात आता त्याला मदत करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. हा देशाच्या सुरक्षेचा व प्रशासनाच्या विश्‍वासार्हता प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा छाजेड, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक शाहु खैरे, राहूल दिवे, आशा तडवी, वत्सलाताई खैरे, अश्‍विनी बोरस्ते, राजेंद्र बागुल, विजय राऊत, लक्ष्मण धोत्रे, बबलु खैरे, मुन्ना ठाकुर, हनीफ बशीर, सुरेश मारु, उद्धव पवार, ज्ञानेश्‍वर काळे, दिनेश निकाळे, प्रमोद धोंडगे, कल्पना पांडे, स्वप्नील पाटील यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
...  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT