Whose Chief Minister, his own government: Sanjay Raut
Whose Chief Minister, his own government: Sanjay Raut  
मुख्य बातम्या मोबाईल

राऊतांनी बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला ललकारले : ज्यांचा मुख्यमंत्री त्यांचेच सरकार!

राजेश कणसे

आळेफाटा (जि. पुणे) : राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्याचेच सरकार असते आणि त्यामुळे आपले हे ठाकरे सरकार आहे. अजून तीन वर्षे बाकी आहेत. आपण जे गमावले, ते कमवा, असे सल्ला देत खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बालेकिल्ल्यात म्हणजेच पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये येऊन ललकारले आहे. (Whose Chief Minister, his own government: Sanjay Raut)

जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आळेफाटा या ठिकाणी आज (ता. ४ सप्टेंबर) मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी राऊत यांनी राष्ट्रवादीला स्पष्ट शब्दांत सुनावले. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असुन भविष्यात त्यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची कार्यक्षमता आहे. 

शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर म्हणाले की भविष्यात जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचाच असेल. त्या साठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे. शिवसेनेने अनेकांना मोठे केले आहे. मात्र, त्यांना त्याची जाणीव नाही.

हेही वाचा : माझे हात दगडाखाली अडकलेले नाहीत, त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, राज्यात जरी महाआघाडी असली तरी येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे सर्वांनी तयारी लागावे. गेल्या दोन वर्षांत दहा ते बारा कोटी रूपयांचा निधी जुन्नर मतदार संघात विविध कामांसाठी दिलेला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आपण प्रयत्न करत असून वेळोवेळी कायदा आणि न्याय विभागाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी प्रयत्न करत आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख, तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, जुन्नर नगर परीषदेचे नगराध्यक्ष शाम पांडे, जिल्हा पषरिदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, नयना डोके, विश्वास आमले, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष दिलीप डुंबरे, पंचायत समीतीचे सदस्य जिवन शिंदे, नेताजी डोके, संभाजी तांबे, दिलीप ढमढेरे, मंगेश काकडे, भास्कर गाडगे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, आनंद चासकर, दत्ता शिंदे आदींसह शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT