Why Khed taluka has no place in the state cabinet? : Dilip Mohite expressed displeasure
Why Khed taluka has no place in the state cabinet? : Dilip Mohite expressed displeasure  
मुख्य बातम्या मोबाईल

खेडला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान का नाही?: मोहितेंच्या मनातील खदखद बाहेर 

सरकारनामा ब्यूरो

राजगुरुनगर (जि. पुणे) : ज्यांच्या नेतृत्वावर खेड तालुका विश्वास ठेवतो, तेही तालुक्‍याचा विचार करत नाहीत, असा तिरकस टोला आमदार दिलीप मोहिते यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

राज्यात सर्वात मोठी एमआयडीसी तालुक्‍यात आहे. पण, तालुक्‍याकडे ज्या पद्धतीने पाहिला पाहिजे, त्या पद्धतीने नेते आणि सरकारही पाहत नाहीत. खेड तालुक्‍याला मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही, अशी मनातील खदखद आमदार मोहिते यांनी रविवारी बोलून दाखविली. 

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या वतीने खेड तालुक्‍यातील बातमीदारांना आरोग्य कीटचे आमदार मोहिते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

भामा आसखेड धरणाच्या पाणी वाटपात एक लिटरही पाणी खेड तालुक्‍याला राहिलेले नाही. त्यामुळे कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण पिंपरी चिंचवडला एक थेंबही पाणी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार मोहिते यांनी घेतला आहे. पाईपलाईन पूर्ण झाली तरी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत, तर पुण्यालाही पाणी सोडणार नाही, असेही ते म्हणाले. 

खेड तालुक्‍यावर धरणे, एमआयडीसी, एसईझेड, रोजगार, राजकीय पदे इत्यादींबाबत सतत अन्याय झाला असून, आंबेगाव, बारामतीला मिळते, ते खेड तालुक्‍याला का नाही? असा खडा सवालही मोहिते यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना केला. 

खेड तालुक्‍यात औद्यगिक क्षेत्र झाले. मात्र, जमिनी जाऊनही स्थानिकांना रोजगार मिळत नाही. एका उद्योजकाने एसईझेडसाठी 4 हजार एकर जमीन घेतली, पण त्यावेळी विकासाबाबत व रोजगाराबाबत दिलेले एकही आश्वासनही त्यांनी पाळले नाही, असेही ते म्हणाले. 

एका उद्योजकास त्यांच्या प्रकल्पासाठी एक टीएमसी पाणी दिले. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आदींसाठीही पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मग, तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आणि वाढत्या लोकसंख्येला पाणी कुठून आणणार? खेड तालुक्‍यात धरणे असून पाणी आधी शिरूर तालुक्‍याला आणि नंतर खेडला असा अन्याय सुरू आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने त्यांचा या पाण्यावर पहिला हक्क आहे, अशी रोखठोक भूमिकाही आमदार दिलीप मोहिते यांनी मांडली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT