Ashish Shelar .jpg
Ashish Shelar .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना? शेलार यांचा सवाल 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शेअर बाजारातून कर्जरोखे विकून पैसे उभे करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार सुरु आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी तीन ते चार हजार कोटी निधीची गरज भागवण्यासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी कर्ज रोखेच विकताय ना? 7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना? असा सवाल शेलार यांनी सत्ताधार्यांना विचारला आहे. 

शेलार आपल्या टि्विटमध्ये म्हणाले की, एकिकडे हेरिटेज वॉक सुरु करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत.. दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला "बाजारात" उभी केलीत. वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच.. अशी टीका शेलार यांनी केली. नीट काळजी घेताय ना? कर्ज रोखेच विकताय ना? 7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. 

काय आहे प्रकरण?

कोरोना महामारीमुळे महानगरपालिकेचे आर्थिक गणीत बिघडू लागले आहे. २०२० -२१ मध्ये कोट्यावधी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी, विकासकांना प्रीमिअमध्ये ५० टक्के सवलत आणि कोरोना काळातील खर्चामुळे माहापिलिकेचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता अशा मोठ्या प्रकल्पांचे काम सुरु ठेवण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे. 

गटनेत्यांच्या बैठकीत होणार निर्णय 

शेअर बाजारातून कर्जरोखे उभारण्याबाबत गेल्या आठवड्यात महापालिका मुख्याल्यात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. सर्वपक्षीय गटनेत्यांचा बैठकीत याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडला जाणार आहे.  
 

Edited By - Amol Jaybhaye  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT