Sharad Pawar Uddhav Thackeray
Sharad Pawar Uddhav Thackeray 
मुख्य बातम्या मोबाईल

..तर शरद पवार, बाळासाहेब थोरात लुटणार शिवसेना दसरा मेळाव्यात विचारांचे सोने ---

गणेश कोरे

पुणे - शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटले की, शिवसैनिकांमध्ये नवचैत्यन्य असते. दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल होत असतात. यंदाच्या कोरोना संकटामुळे मेळावा होणार कि, नाही अशी चर्चा असताना,  शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मेळावा सावरकर स्मारकात निमंत्रित शंभर प्रमुख नेते उपनेते यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे जाहिर केले.

यंदाचा मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री या नात्याने संबोधित करणार असल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तर या मेळाव्याला महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित असतील. 

शिवसेना भाजपा युतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दसरा मेळाव्याला उपस्थित होते. यामुळे आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौटुंबिक  ऋणानुबंध जगजाहीर आहेत. शिवसेना भाजपाचे संबंध मुख्यमंत्री पदावरुन दुरावल्यानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीची मोट बांधत,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले. यानंतर ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कार्यरत असताना, शिवसेनेचा दसरा मेळावा रविवारी (ता.२५)  साजरा होत आहे. कोरोना संकटामुळे मेळावा होईल कि नाही अशी शंका होती. मात्र आता हा मेळावा सावरकर स्मारकात 100 प्रमुख मंत्री, नेते, उपनेते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहिर केले. त्यामुळे या मेळाव्याला महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले जाणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केल्यास,प्रथमच शरद पवार, बाळासाहेब थोरात शिवसेना दसरा मेळावा व्यासपीठावर उपस्थित राहून, विचारांचे सोने लुटणार कि, स्वतंत्र विचार देणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT