women deputy collector trapped by acb in sangli
women deputy collector trapped by acb in sangli 
मुख्य बातम्या मोबाईल

सांगलीत महिला उपजिल्हाधिकाऱ्यास अटक

सरकारनामा ब्युरो

सांगली : कन्सेंट प्रमाणपत्रासाठी पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती संतोष शेंडे (वय 43, रा. विश्रामबाग, मूळ रा. विटा) यांच्यासह तिघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 

सहायक क्षेत्र व्यवस्थापक सुभाष मारुती माळी (53, रा. एमआयडीसी, कुपवाड) आणि कंत्राटी लिपिक सुनील भूपाल कुरणे (30, रा. विजयनगर, मूळ रा. म्हैसाळ) अशी अन्य दोघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी एमआयडीसीच्या कार्यालयात ही मोठी कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कारवाईबाबत या विभागाने दिलेली माहिती अशी : तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने कडेगाव येथे औद्योगिक विकास महामंडळाचा प्लॉट 95 वर्षांच्या कराराने घेतला आहे. तेथे बांधकाम केले आहे. उद्योगास आवश्‍यक कच्चा माल खरेदी करण्यासाठी तक्रारदार यांच्या पत्नीस बॅंक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज मंजूर झाले आहे. या कर्जाची रक्कम मिळण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून कन्सेंट प्रमाणपत्राची गरज होती. तक्रारदार यांनी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 

दरम्यान, तक्रारदार आणि त्यांची पत्नी दोघेही सोमवारी (ता.9) त्रैवार्षिक करार करण्यासाठी येथील एमआयडीसी कार्यालयात गेले होते. कन्सेंट प्रमाणपत्र दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडेस पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी लिपिक सुनील कुरणे याने केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. 

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लिपिक सुनील कुरणे, सहायक क्षेत्रपाल सुभाष माळी यांच्यासह प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे यांनी लाचेची मागणी केल्याचे निषन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये घेताना शेंडे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह माळी आणि कुरणेविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT