rajiv_gandhi
rajiv_gandhi 
मुख्य बातम्या मोबाईल

राजीव गांधींनी रचलेल्या पायावरच ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा  : अजित पवार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ राजीव गांधी यांनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
               

स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "स्वर्गीय राजीव गांधीं यांच्यासारखा युवा पंतप्रधान देशाला लाभल्याने युवकांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले गेले. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीव गांधी यांना आहे. सध्या कोरोना विषाणूच्या संकटात अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संवाद साधत आहेत. हे देखिल राजीव गांधी यांनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झालं आहे."

अजित पवार म्हणाले, "वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी युवकांना निर्णयप्रक्रियेत संधी दिली. सर्वधर्मसमभाव वाढावा, देशात व उपखंडात शांतता नांदावी म्हणून काम केलं. त्यांचा स्मृतीदिन 'दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस' म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करु या, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे."

ही पण बातमी वाचा - केंद्रातील सरकार बरखास्त करा : मुश्रीफ

कोल्हापूर : देशात कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वात आधी बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. मुंबईतील कार्यालयातून त्यांनी ही प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाच्या कामाचे कौतुक केले. मुश्रीफ म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर केला व राज्यपालांच्या बैठकीला येणार नाही, असे सांगून आपला करारी बाणा दाखविला. जेव्हापासून ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून भाजपा राजकारण करत आहे. कोरोनाविरोधात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे निवेदन त्यांनी दिले. वास्तविक देशासह राज्यात कोरोना संसर्ग वाढतच असताना सर्वांनी एक होऊन कोरोनाशी लढणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत भाजप, मात्र राजकारण करण्यात गुंतला आहे, त्याचा निषेध केला पाहिजे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT