<div class="paragraphs"><p>Ajit Pawar on OBC Reservation</p></div>

Ajit Pawar on OBC Reservation

 

sarkarnama

व्हिडिओ

ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मार्चपर्यंत मिळणार: अजित पवार,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

ओबीसी आरक्षणासाठी(OBC Reservation) लागणारा इम्पेरिकल डेटा मार्च पर्यंत मिळणार असून त्यासाठी आम्ही पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी दिली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी नियोजित कार्यक्रमाला दीड तास आधीच नायगाव येथे आगमन झाले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केल्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आदी उपस्थित होते. कोरोनाचे निर्बंध पाळण्यासाठी आपण नियोजित वेळेच्या आधी दीड तास आधी येऊन कार्यक्रमास उपस्थिती लावल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT