Sarkarnama
Sarkarnama
व्हिडिओ

वसईत आदिवासी महिलांना पोलिसांकडून मारहाण प्रकरण; पाहा व्हिडिओ

Aditya Kakde

भाजप नेत्या चित्रा वाघ पोलीस उपायुक्तांच्या भेटीला दोषींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी वसईत आदिवासी महिलांना पोलिसांनीच केलेल्या मारहाण प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी आज वसईचे उपायुक्त संजय पाटील यांची भेट घेतली व स्वतः पीडित आदिवासी महिलांशी बातचीत करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. फक्त वसईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात अश्या प्रकारे खाकीच्या जोरावर पोलिसांनी अरेरावी केल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक न करता पोलिसांनी चोर व बलात्काऱ्यांवर खाकीचा जोर दाखवावा असे वक्तव्य करत घडलेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी दोषींना मागे न टाकता त्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT