Abhijeet Dipke Sarkarnama
Video

Abhijeet Dipke: आजीचं निधन, दिपकेंची जामिनावर सुटका, आईची भावुक प्रतिक्रिया

Abhijeet Dipke Released: अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई यांचे निधन झाल्यानंतर दिल्लीतील प्रतिबंधात्मक ताब्यातून त्यांची जामिनावर सुटका झाली. आजीच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याच्या मुद्द्यावर आई अनिता दिपके यांनी भावुक प्रतिक्रिया दिली.

सरकारनामा ब्यूरो

Abhijeet Dipke: दिल्ली पोलिसांनी काल ताब्यात घेतल्यानंतर आज सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात अभिजीत यांच्या आजीचे निधन झाल्याने, त्यांना आजीच्या अंत्यविधीला उपस्थित राहू न दिल्याबद्दल कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'कालच अभिजीतला सोडलं असतं, तर आज तो आजीच्या अंत्यसंस्काराला वेळेत पोहोचू शकला असता,' अशी अत्यंत भावुक आणि संतप्त प्रतिक्रिया अभिजीत यांच्या आई अनिता दिपके यांनी दिली असून त्यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT