Ajit pawar, beed Sarkarnama
Video

Ajit Pawar यांचा दौरा ऐनवेळी रद्द; 1 हजार विकास कामांचं भूमिपूजन लांबणीवर ।Beed News।

नगरपरिषद विजयानंतर पहिला दौरा रद्द; महापालिका निवडणुका आणि कॅबिनेट बैठक कारणीभूत

सरकारनामा ब्यूरो

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आजचा बीड दौरा अचानक रद्द झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपरिषद निवडणुकांमधील दणदणीत यशानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर येणार होते. सकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रमांची मालिकाच नियोजित होती. तब्बल 1 हजार विकासकामांची घोषणा तथा भूमिपूजन शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती उभारण्यात आलेल्या मंडपातून बीडकरांना संबोधित करत ते करणार होते. तसेच सहकार भवनचे भूमिपूजन, टेनिस कोर्टचे उद्घाटन, मच्छिंद्रनाथ गड विकास आराखडा, औद्योगिक क्षेत्र, वन पर्यटन प्रकल्पांचे सादरीकरण आणि जिल्हा रस्ता सुरक्षेचा आढावा घेण्याचा कार्यक्रम होता. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि सशस्त्र ध्वज निधी संकलनातील राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विशेष सोहळाही नियोजित होता. मात्र ऐनवेळी महापालिका निवडणुका आणि कॅबिनेट बैठकीमुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT