Donald trump , narendra modi  Sarkarnama
Video

अमेरिकेने भारतावर 25% आयात शुल्क का लावलं ? | America imposed tariffs on india|

India वर ट्रम्पचा बदला? | 25% Import Tariff ची खरी कारणं | Modi vs Trump

सरकारनामा ब्यूरो

डोक्यावर परिणाम झालेला व्यक्ती वागतो तशी काहिशी परिस्थिती झालीये सध्या ट्रम्प तात्याची. कधी भारतासोबत मैत्रीचे दावे करायचे आणि मग भारतावर टीका करायची. त्यातूनही समाधान नाही झालं तर स्वत:च्याच समाधानासाठी काहीतरी घोषणा करायची. १ ऑगस्टपासून भारतावर लादलेले टेरीफ याची कारण आर्थिक नव्हे तर बदला घेण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय असल्याचं दिसून येतं.

मोदींनी भर लोकसभेत ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी मध्येस्थी केली नाही हे स्पष्ट केलं. तुम्हाला आठवत असेल तर भारत-पाकिस्तान युद्द कस माझ्यामुळे थांबलं हे ट्वीट करत जगाला दाखवण्याचा प्रयत्न ट्रम्पने केला होता. मात्र लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु असताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं की युद्ध थांबवण्यासाठी कोणाचा फोन आला ते एकदाचं स्पष्ट करून टाका. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले जगातल्या कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यासंबंधी म्हटलेलं नाही. त्याचवेळी ९ मे रोजी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी मला बोलण्याचा प्रयत्न केला. तासभर ते प्रयत्न करीत होते. मात्र माझी सेनेसोबत बैठक सुरु होती. नंतर मी त्यांना फोन केला. त्यांनी मला फोनवर सांगितलं की, पाकिस्तान खूप मोठा हल्ला करणार आहे. मी म्हटलो, जर पाकिस्तानचा हा इरादा असेल तर त्यांना हे महाग पडेल. आम्ही ही मोठा हल्ला करुन उत्तर देऊ. अशी माहिती मोदींनी लोकसभेत दिली.. अर्थात, त्याच्या काही वेळाने लगेच अमेरिकेत ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा त्यांच्या श्रेयासाठी आग्रह केला. लोकसभेत झालेल्या या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी भारतावर २५% आयात शुल्क आणि दंड लावण्याची घोषणा होणं हा योगायोगा नसावाच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT