मागच्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हे इतर भाजप किंवा शिंदेगटात पक्षप्रवेश करणार याची चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला खासदार संजय जाधव तसेच त्यांचे समर्थक असलेले जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव आणि इतर तालुकाप्रमुख हे गैरहजर होते यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने खासदार समर्थक असलेले जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्या जागी तडकाफडकी विष्णू मुरकुटे यांना जिल्हाप्रमुख पद दिले यामुळे नाराज झालेल्या खासदार समर्थकांनी आज परभणीच्या सावली विश्रामगृहावर बैठक घेत गंगाप्रसाद आनेराव यांच्यावर केलेली कारवाई चुकीची असल्याचे म्हणत राजीनामे दिले आहेत.ठाकरेंनी केलेली कारवाई आणि खासदार समर्थकांमध्ये असलेली नाराजी यामुळे सध्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आंतरयुद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.