Nagpur News: वंचित बहुजन आघाडीचा राजकीय आलेख ओसरत चालला असल्याचे बघून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आता तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात आहेत. ही आघाडी अधिक व्यापक करण्यासाठी आदिवासी समाजालाही यात समावून घेण्याचे प्रयत्न केले जात आहे. आदिवासींच्या हक्कासाठी लढा दोणाऱ्यांना विधानसभेत पाठवायचे असल्याचे सांगून आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या वाटचालीचे संकेत दिले.
२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेसला चांगलाच फटका बसला होता. मोठमोठे नेते त्यावेळी पराभूत झाले होते. त्यानंतर मात्र आघाडीला आपले महत्त्व टिकवता आले नाही.
यावेळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यातून पराभूत झाले. महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे विभाजन टाळण्यात विरोधकांना यश आले. आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे अनेक प्रयत्न झाले. आता आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला सुरुवात केली आहे. त्यांनी मंगळवारी नागपूरमध्ये आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मला कुठल्या एका जातीची पार्टी चालवायाची नाही तर समदुःखी लोकांना सोबत घेऊन चालत जायचे असल्याचे सांगितले.
आंबेडकर म्हणाले, "आम्ही किती उमेदवार लढणार हे वेळवर सांगू. आम्ही तिसरी आघाडी करीत आहोत. ज्यांना यायचे आहे, त्या सर्वांचे स्वागत आहे. आदिवासी समूहाच्या अधिकारासाठी लढा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली. सर्व संघटनांनी एकत्र येऊन आदिवासींचे प्रतिनिधी विधानसभेते गेले पाहिजे. आठ दिवसांनी या सर्व संघटना एकत्र येऊन आपल्या अजेंडा मांडणार आहेत.
आंबेडकर म्हणाले, भारतात देशाचे ९० टक्के खनिज आदिवासी भागात आहे. परंतु त्याचा उपयोग गैर आदिवासी करीत आहे. शहरी नक्षलवाद कायदा आल्यास ग्रामीण नक्षलवाद कायदा येणार आहे. याविरोधात आवाज उचलण्यासाठी आदिवासी समाजाचे अधिकाधिक लोकप्रतिनिधी विधानसभेत असणे आवश्यक आहे. आदिवासींचे संरक्षण, खनिजाचे संरक्षण आम्हाला करायचे आहे.
आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अनसुचित जाती, जमातींचे नुकसान करणार आहे. या निर्णयामुळे भले करण्याऐवजी नुकसान होणार असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.