Narendra Chapalgaonkar
Narendra Chapalgaonkar sarkarnama
विधायक

Narendra Chapalgaonkar : संमेलनाध्यक्ष चपळगावकरांना पोलिसांना अडवलं ; "आम्ही मारेकरी दिसतो का..?

सरकारनामा ब्युरो

Marathi Sahitya Sammelan News : वर्ध्यात सुरू असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज (रविवारी) समारोप होत आहे. (Marathi Sahitya Sammelan News update)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होत असतानाच संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) हे साहित्य नगरीत येत होते. मात्र, पोलिसांनी प्रवेशद्वारावरच त्यांचे चारचाकी वाहन अडवले. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनातील पोलीस सुरक्षेचा फटका थेट संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना बसला आहे. त्यामुळं त्यांना व्यासपीठावर येता आलं नाही. त्यांची नाराजी त्यांची मुलगी भक्ती चपळगावकर यांनी सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. "पोलिसांनी वाहन रोखताच नरेंद्र चपळगावकर यांची मुलगी भक्ती चपळगावकर यांनी आम्ही मारेकरी दिसतो का?" अशा शब्दांत पोलिसांना सुनावले.

समारोपाच्या सकाळच्या सत्रातील परिसंवादाला राजकीय मंडळींची मांदियाळी आज (रविवारी) व्यासपीठावर होती. या व्यासपीठावर जात संमेलनाध्यक्ष चपळगावकर हे त्यांची मुलगी भक्ती चपळगावकर याच्यासह निघाले होते. तेव्हा हा प्रकार घडला.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनाला मुख्यमंत्री बोलत असताना विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. त्यामुळं आज मोठा पोलीस बंदोबस्त संमेलनास्थळी तैनात करण्यात आला होता. याचा फटका संमेलनाध्यक्षाना बसला आहे.

भक्ती चपळगावकर म्हणतात..

भक्ती चपळगावकर यांनी म्हटलं आहे की, माझे बाबा आणि माझे कुटुंब वाहनातून संमेलन स्थळी येत असताना प्रवेशद्वारावर अडवणूक करण्यात आली. मी पोलिसांवर ओरडले. त्यानंतर आम्हाला सोडले. आयोजकांनी पासेस देणे गरजेचे होते.

साहित्य नगरीतील आचार्य विनोबा भावे सभामंडपात संमेलनाचा समारोप झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर,आमदार समीर कुणावार, आमदार समीर मेघे, सागर मेघे,अभ्युदय मेघे यांच्या उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT