Dinvishesh 26 September Sarkarnama
विशेष

26 September in History : त्यावेळी स्वबळावर, यावेळचं काय?

सरकारनामा ब्यूरो

आज युती-आघाड्यांचा खेळ सुरु आहे, तसाच खेळ 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही सुरु होता. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी चर्चेचे गुऱ्हाळ चालवत होत्या. सगळ्यांचं घोडं महत्त्वाच्या जागांवर आणि स्वतःच्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यावर अडलं होतं.

पण अखेर आज स्वबळावर लढू आणि निवडणुकीनंतर युती-आघाडीचं पाहू अशाच निष्कर्षाला सगळेच पक्ष आले. त्यापूर्वी 25 वर्षे शिवसेना-भाजपमध्ये युती होती. तर धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा वर्षे एकत्र नांदले होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री.

त्यावेळची ही सगळी घडामोड दैनिक सकाळच्या 26 सप्टेंबर, 2014च्या अंकात सविस्तर विश्लेषणासह प्रसिद्ध झाली होती. हीच आहे ती बातमी.....

26 September 2024 dinvishesh

आजचे दिनविशेष - २६ सप्टेंबर

दिनविशेष - 26 सप्टेंबर

1894 - गांधीवादी तत्त्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा जन्म. लोकशिक्षक, नवभारत, साधना, अखंड भारत या मासिकांतून त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी गांधीवाद, मार्क्‍सवाद व इतर राजकीय व सामाजिक विषयांवर मूलगामी विवेचन करणारे अनेक ग्रंथ लिहिले. "आधुनिक भारत' हा त्यांचा प्रमुख ग्रंथ.

1932 - भारताचे पंतप्रधान, खुल्या अर्थव्यवस्थेचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म. त्यांची जपानमधील "निहोन केझ्झाई शिम्बून' या प्रमुख अर्थविषयक दैनिकातर्फे "निक्केई आशिया' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांना लोकमान्य टिळक सन्मानानेही गौरविण्यात आले. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 1996 साठीचा सुलभ इंटरनॅशनल या संस्थेतर्फे "ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविले.

1956 - महाराष्ट्रातील उद्योगधंद्याचा पाया घालणारे उद्योगपती लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचे निधन.

2001 - "सकाळ'चे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रतापराव पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी निवड. "सकाळ' चे संस्थापक - संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्यानंतर सुमारे चाळीस वर्षांनी "सकाळ'ला हा मान मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT