TOP 10 News  Sarkarnama
विशेष

Top 10 News : रोहित पवार 50 जणांना पाडणार, राज ठाकरेंचा वाचाळवीरांना टोला, विशाल पाटलांना कोण म्हणाले सरडा? वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Rashmi Mane

सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

तर आता जाणून घेऊयात आज दि. 2 ऑक्टोबर, 2024 रोजी रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी

गांधी जयंतीनिमीत्त राज ठाकरेंचा ट्विटमधून वाचाळवीरांना टोला.. महाराष्ट्रात वाचाळवीरांना फारच बरे दिवस आल्याचं म्हणत... वादग्रस्त वक्तव्य थांबवण्याचा सल्ला...

आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य... त्यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता...

मुख्यमंत्र्यांच्या सांगलीतल्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप (BJP), राष्ट्रवादीनं फिरवली पाठ... मेळाव्यात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गैरहजर...

अजित पवारांच्या दोन आमदारांनी फिरवली पक्षाच्या मेळाव्याकडे पाठ...वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे मेळाव्याला गैरहजर..तुपेंनी काही दिवसांपूर्वी घेतलेली शरद पवारांची भेट

सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पालकांचा ठिय्या, आजारी मुलांना घेऊन पालकांचं आंदोलन...पैसे नको सुदृढ आरोग्य द्या, पालकांची मागणी

रोहित पवार (Rohit pawar), राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार...लक्ष्मण हाकेंचं विधान...मनोज जरांगेंना पोसणाऱ्या आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना पाडण्याचा इशारा

शाहांनी 2029 सांगून आधीच माघार घेतली, काँग्रेस प्रभारी चेन्नीथलांची उपहासात्मक टीका...तर 2029 पर्यंत सरकार राहणार की नाही ते बघा...संजय राऊतांचा खोचक टोला...

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला..सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा...विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

काँग्रेस नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह... जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आवश्यक कागदपत्र सादर न केल्यानं टांगती तलवार...

'सरड्याला लाज वाटेल असं काम विशाल सरडा करतोय'.. संजयकाका पाटलांची विशाल पाटलांवर जहरी टीका...'संजयकाका नगरपंचायतीला उभे राहतील अशी स्थिती'..विशाल पाटलांनी केलेलं वक्तव्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT