Murji Patel & Activists
Murji Patel & Activists  Sarkarnama
विशेष

'ये बहुत गलत हुआ है' : भाजपच्या माघारीच्या निर्णयावर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते संतप्त

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंधेरी (Andheri) पूर्व पोटनिवडणुकीतून (ByElection) माघार घेत असल्याची घोषणा नागपुरात केली. मात्र, त्याचे पडसाद मुंबईत उमटले. अंधेरी पूर्वचे पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी भाजप नेतृत्वाचा निर्णय मान्य केला आहे. मात्र, पटेल यांच्या कार्यकर्त्यांना संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. मुंबईतील एक कार्यकर्त्याने भाजप श्रेष्ठीच्या निर्णयावर ‘बहुत गलत हुआ है’ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Activists of Murji Patel angry over BJP's decision to withdraw)

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोधसंदर्भात भूमिका घेतली होती. त्यानंतर भाजपच्या गोटात वेगवान हालचाली घडल्या. दिल्लीहून पक्षाचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवि हे आज सकाळीच मुंबईत दाखल झाले. त्यांनी प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि सचिव रवी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपुरात घोषणा केली.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय उमेदवार मुरजी पटेल यांनी मान्य केला आहे. त्यानुसार ते आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेणार आहेत. पटेल यांनी हायकमांडचा निर्णय मान्य केला असला तरी पटेल यांच्या कार्यकर्त्यांना तो मान्य नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे. भाजप श्रेष्ठींच्या निर्णयावर संताप व्यक्त करत ‘ये जो हुआ है, वो बहुत गलत हुआ है,’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT