बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे महाविकास आघाडीला जो पर्यंत आशीर्वाद आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) कसलाही धोका नाही, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले. (After Raut's warning, Ajit Pawar's big comment about Mahavikas Aghadi)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एक विधान केले होते. त्यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचे सावरकारांबाबतचे विधान महाविकास आघाडीत फूट पाडणारे ठरू शकते, असे म्हटले होते. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.
संजय राऊत यांच्या विधानानंतर काँग्रेस नेत्यांकडून त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीही त्यावर भाष्य केले होते. त्यामुळे पवार यांचे आजचे विधान महत्वाचे ठरते.
अजित पवार म्हणाले की, हिवाळी अधिवेशन सुरू व्हायला अजून अवकाश आहे. इतक्या लवकर तुम्हाला माझे मुद्दे सांगून माहिती देऊ इच्छित नाही. कारण, मी सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे, त्याच्यामध्ये सगळे आम्ही एकोप्यांनी बसू चर्चा करू आणि त्याच्यात मुद्दे ठरवू. आता मुद्दे जर मी तुम्हाला सांगितले तर इतर नेते अजित पवार तुम्ही आधीच मुद्दे सांगितले, कशाला आम्हाला बोलवले, असे म्हणतील. शेवटी ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात, त्यावेळेस असे निर्णय आधी घ्यायचे नसतात. चर्चा विनिमय करून आम्ही सगळे एकमताने कुठेतरी त्या विषयाबद्दल येऊन आणि तिथे पत्रकार परिषद घेऊन ते सांगू.
विकासकामांच्या स्थगितीबाबत बोलताना पवार यांनी सांगितले की, जी विकास कामे मंजूर आहेत, ती थांबविणे उचित नाही. तुम्ही नवीन कामे जरूर सुरु करा. त्याला गती द्या, याबाबत काही दुमत नाही. मात्र, विरोधकांच्या कामांना सापत्न वागणूक देऊ नका. काही फ्लायओव्हर व पुलांच्या कामांची स्थगिती उठवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.