Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
विशेष

Ajit Pawar Group News : अजित पवार गटाने बोलावली बैठक, पक्षप्रतोद अनिल पाटील बजावणार व्हीप; पवारांसोबतच्या आमदारांकडे लक्ष

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला हजर राहण्यासाठी पक्ष प्रतोद अनिल पाटील हे सर्व आमदारांना व्हीप बजावणार आहेत, त्यामुळे शरद पवार गटाचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (Ajit Pawar group has called a meeting of MLAs tomorrow)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उभी फूट पाडली आहे. पवार यांच्यासोबत ३५ ते ४० आमदार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे १३ ते १४ आमदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदारांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

येत्या सोमवारपासून (ता. १७ जुलै) मुंबईत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने सर्व आमदार, खासदारांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे सर्व आमदारांना व्हीप बजावणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदारही या बैठकीला येतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शरद पवार गटाची १२ आमदारांना नोटीस

दरम्यान, शरद पवार गटानेही शुक्रवारी पाच जुलै रोजीच्या बैठकीला गैरहजर राहून पक्षविरोधी कारवाई केली, म्हणून अजित पवार गटातील १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी ४८ तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आमदार सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकपुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे आदींचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT