Ambadas Danve
Ambadas Danve sarkarnama
विशेष

अंबादास दानवे हे शिंदे सरकारवर तुटून पडत असतानाच शेजारी बसलेले नेेते पेंगू लागले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे औरंगाबादमधील आक्रमक नेते अंबादास दावने (Ambadas Danve) यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाल्याने स्वारी सध्या खूषीत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधी नेत्यांना मोठा मान असतो. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. (Maharashtra Assembly session) त्या आधी विरोधी नेत्यांची आणि सत्ताधाऱ्यांची स्वतंत्र भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद होत असते. सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार हा विरोधी पक्ष टाकतो. हे सांगण्याच्या निमित्ताने जुगलबंदी रंगते.

तर दानवे यांचे हे विरोधी नेता म्हणून पहिलेच अधिवेशन आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांची आज बैठक बोलविली. त्याला दिग्गज नेते हजर होते. सरकारला कसे कोंडीत पकडायचे याची रणनीती या बैठकीत ठरली. त्यानंतर दोन्ही विरोधी नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी महाविकास आघाडीतील दोन्ही सभागृहांतील प्रमुख नेते विरोधी नेत्यांसोबत व्यासपीठावर बसले होते. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, शिवसेनेचे अनिल परब, काॅंग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप यांचा समावेश होते. परब तर एकदम कोपऱ्यात बसले होते.

अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनुसार पत्रकार परिषदेला सुरवात केली. पहिली 10-15 मिनिटे त्यांचीच बॅटिंग सुरू होती. त्यात त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या संतोष बांगर आणि प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा मुद्दा मिळाला आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. मस्ती आली आहे, सत्ता डोक्यात गेली आहे, अशी विधाने करत अजितदादांनी पत्रकार परिषदेत `ब्रेकिंग न्यूज`च दिली. दादांचा दांडपट्टा थांबल्यानंतर मग त्यांनी आता दानवे बोलतील म्हणून सांगितले.

Ambadas Danve

दानवे यांची कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. त्या वेळी शेजारी असलेले नेते पेंगू लागले. हे नेते ज्येष्ठ असल्याने त्यांना दानवे यांच्या मुद्द्यांमध्ये दम वाटत नव्हता की काय, असे अनेक पत्रकारांना वाटून गेले. या नेत्यांच्या डुलक्यांचे नेमके छायाचित्र टिपण्यात आले. भाई जगताप झोपेच्या अधीन झाले आहेत. अजितदादांचे डोळे उघडे असून बंद असल्यासारखे आहेत. बाळासाहेब थोरात हे चिंतन करत असल्याचा भास दाखवत आहेत. एकनाथ खडसे तर दोन्ही हातांची घडी घालून मस्त डुलकी घेताना दिसले. त्यांच्या शेजारी बसलेल्या परब यांनीही मान टाकल्याचे दिसून आले. या साऱ्या दृश्यानंतर साहजिकच हे छायाचित्र व्हायरल आणि दानवे यांची अधिवेशनाआधीची पहिली पत्रकार परिषद गाजली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT