Ankita Patil-Nihar Thackeray  Sarkarnama
विशेष

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून

अंकिता (Ankita Patil) या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तर निहार ठाकरे (Nihar Thackeray) हे वकिल आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता या आता ठाकरे घराण्याची सून होणार आहे. निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी येत्या 28 डिसेंबर रोजी त्यांचा विवाह होणार आहे.

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली व्यवसायात जम बसविला आहे. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्ये आणि एक वर्ष हार्वर्डमध्येही शिक्षण घेतले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत. गेले काही दिवस या दोघांच्या विवाहाची चर्चा होती. त्याची अधिकृत माहिती आज जाहीर झाली.

Harshvardhan-Raj Thackeray

हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची या निमित्ताने भेट घेतली आणि त्यांना विवाहाचे निमंत्रण दिले. मुंबईत येत्या 28 डिसेंबर रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली. विवाहाच्या निमित्ताने पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा येथेही गावकऱ्यांसाठी थाटामाटाने भोजनसोहळा 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

Nihar Thackeray

निहार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यांच्या वडिल बिंधूमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते. बिंदूमाधव यांच्या निधनाचा बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार यांचे सख्खे काका तर राज हे चुलतकाका आहेत. या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत.

महाराष्ट्रात अनेक राजकीय कुटुंबात सध्या विवाहाची धामधूम पार पडली. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरात लग्नकार्ये पार पडली. आता वधूपिता पाटील यांच्या घरात लग्नाची धावपळ सुरू आहे. त्यानिमित्त ते विविध नेत्यांच्या गाठीभेट घेत आहेत.

बाळासाहेब ठाकरे नातवंडांसोबत

निहार ठाकरे यांच्या फेसबुकवरील फोटो.

Nihar Thackeray

निहार ठाकरे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत

Ankita Patil

अंकिता पाटील

Ankita Patil with mother

अंकिता पाटील आई भाग्यश्री यांच्यासोबत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT