Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहेत तरी, या प्रकरणातील गुढ अद्याप कायम आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 27 आरोपींना अटक करून त्यांच्यावर 'मकोका' अंतर्गत आरोपपत्र दाखल केले. मात्र, हत्येचा कथित मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोई (गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ) हा अद्यापही फरार आहे.
मुंबईच्या या हायप्रोफाईल हत्येचे गुढ एक वर्षानेही कायम राहिल्याने, पोलीस यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात वकीलाने मोठा दावा केला असून या हत्येच्या तपास प्रकरणात सत्य लपवले जात असून पोलिसांना खुनाचे नेमके कारण माहित नाही. तर या प्रकरणातील सहा आरोपींसह मुख्य शूटरने जबाब मागे घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते बाबा सिद्दिकी यांची 13 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे परिसरातील खेरवाडी सिग्नलजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 27 आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. दुसरीकडे मात्र या प्रकरणात वकीलाने मोठा दावा केला असून या हत्येच्या तपास प्रकरणात सत्य लपवले जात असल्याचा म्हटले आहे.
पोलिसांच्या तपासात काय पुढे आले
या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार, खुनाच्या मुख्य सूत्रधाराला अटक करता आलेली नाही. पोलीस हत्येचे नेमके आणि ठोस कारण कोर्टात पटवून देऊ शकलेले नाहीत. मुंबई गुन्हे शाखेने उघड केले की तिन्ही संशयित गोळीबार करणाऱ्यांनी हत्येपूर्वी गँगस्टर लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईशी बोलले होते. अनमोलदेखील फरार असून अमेरिकेत आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये कॅलिफोर्निया पोलिसांनी त्याला अटक केली होती, परंतु नंतर त्याला सोडून देण्यात आले.
मास्टरमाइंड अद्याप फरार
एक वर्ष उलटून गेले आहे आणि 27 जणांना अटक करण्यात आली आहे, परंतु हत्येचे कथित मास्टरमाइंड शुभम लोणकर आणि यासीन अख्तर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. शुभम लोणकरने फेसबुकवर हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या यासीन अझरबैजानमध्ये असल्याचे समजते.
आरोपपत्रात ही कारणे केली नमूद
या प्रकरणात 27 जणांना अटक करूनही पोलिसांना हत्येचे ठोस कारण सांगता येत नाही, याचा अर्थ सत्य दडपले जात आहे, असा थेट दावा वकिलांनी केला आहे. या हत्येमागे सलमान खान सोबतची जवळीक, एसआरए (SRA) प्रकल्पातील वाद, बिश्नोई टोळीला मुंबईत दहशत निर्माण करायची होती, अशी काही कारणे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केली आहेत.
पोलिस सत्य लपवत असल्याचा वकिलाचा दावा
या प्रकरणात झीशान सिद्दिकी यांचे वकील प्रदीप घरत हे आहेत. ते म्हणाले, 'बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी आणि मुलगी अर्शिया यांनी मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईविरुद्ध कारवाई करण्याबाबत माहिती अधिकार अर्ज दाखल केला. मुंबई पोलिसांनी उत्तर दिले की ते कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यानंतर आम्ही न्यायालयात अपील केले, परंतु ते फेटाळण्यात आले. आता आम्ही पुन्हा अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपपत्रात सूचीबद्ध केलेल्या 26 अटक आरोपींपैकी शिवकुमार गौतम हा मुख्य गोळीबार करणारा होता. त्याच्यावरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी केवळ घटनेत सहभागी होते.'
27 आरोपींना अटक; कोणालाही जामीन नाही
या प्रकरणांत 2024 मध्ये 26 जणांना अटक करण्यात आली होती. 27 वा आरोपी अनमोल गायकवाड याला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली. तो पुण्याचा रहिवासी आहे. आम्ही आरोपींच्या जामिनासाठी अपील केले आहेत. अद्याप कोणालाही जामीन मिळालेला नाही. न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत सहा आरोपींनी त्यांचे जबाब बदलले आहेत. यामध्ये मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि रेकी केल्याचा आरोप असलेल्या नितीन सप्रे यांचा समावेश आहे. पोलिसांनी दबावाखाली त्यांचे जबाब नोंदवले, असे त्यांचे म्हणणे आहे, असे बचाव पक्षाचे वकील अंजिक्य मिरगल म्हणाले.
बिल्डर लॉबीची पोलिसांनी चौकशी करावी
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आरोपपत्रात 126 जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी आहे. झिशानला अनमोल बिश्नोई गँगवर हत्येचा संशय नव्हता. त्याने बिल्डर लॉबीला दोषी ठरवले आणि काही व्यक्तींची नावे घेऊन त्याच्या वडिलांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे.
पोलीस यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक केलेल्या 27 आरोपींपैकी 8-9 आरोपी ठाणे तुरुंगात आहेत. गोळीबार करणारा शिवकुमार हा आर्थर रोड तुरुंगात आहे. कल्याण तुरुंगातही अनेक आरोपी आहेत. दरम्यान मुंबईच्या हायप्रोफाईल हत्येचे गुढ एक वर्षानेही कायम राहिल्याने, पोलीस यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.