Vilasrao_deshmukh_Ulhasdada sarkarnama
विशेष

`मंत्रीपदासाठी डायरेक्ट इंदिरा गांधींनी तुझं नाव फायनल केलंय!`

दिवाळी निम्मित्त पवार यांची विषेश मुलाखत आयोजित करण्यात आली होती यात ते बोलत होते.

ऋषीकेश नळगुणे

बाबासाहेब भोसले (Babasaheb Bhosale) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी बातमी होती. अगदी त्यांना स्वत:ला सुद्धा. असे म्हणतात की, इंदिरा गांधींना (Indira Gandhi) अभयसिंहराजे भोसलेंना (Abhyasinhraje Bhosale) मुख्यमंत्री करायचे होते पण नावात चूक झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले. पण काही का असेना, २१ जानेवारी १९८२ रोजी बाबासाहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. १९८० साली पहिल्यांदा आमदार झालेले बाबासाहेब १९८२ साली थेट मुख्यमंत्री झाले होते. ते उणे-पुरे १३ महिनेच या पदावर होते, मात्र याकाळात महाराष्ट्रभर चर्चा झाली ती त्यांच्या विनोदबुद्धीची.

हजरजबाबी असलेले बाबासाहेब बोलायलाही तेवढेच मनमोकळे आणि दिलखुलास होते. त्यांच्या अशाच दिलखुलासपणाचा अनुभव एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांना आला होता.

काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना याबाबतची आठवण सांगितली आहे. दिवाळी निम्मित्त पवार यांची विषेश मुलाखत आयोजित करण्यात आली होती यात ते बोलत होते. त्यांची ही सविस्तर मुलाखत आपण सरकारनामाच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर हि सविस्तर मुलाखत पाहू शकणार आहात.

उल्हास पवार सांगतात, बॅरिस्टर अंतुलेंची (A.R. Antuly) गच्छंती झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी मोबाईल नव्हते. मी, विलासराव देशमुख, गेव्ह आवरी, गणेश दुधगांवकर असे सगळे आमदार निवासात निवांत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी बातम्यांमधून मंत्रीमंडळाची यादी आली, यात विलासरावांचे राज्यमंत्री म्हणून समावेश झाला होता ही बातमी ऐकताच विलासराव भावूक झाले. सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. घरच्यांशी देखील ते काहीशे हळवे होवूनच बोलत होते.

पवार पुढे सांगतात, शपथविधीनंतर आम्ही सगळे जण हार घेवून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो. बाबासाहेबांच्या आजूबाजूला समर्थकांची, कार्यकर्त्यांची, बातम्यांसाठी पत्रकारांची तोबा गर्दी जमली होती. त्या गर्दीतून वाट काढत सगळे बाबासाहेबांजवळ पोहचलो. विलासरावांनी हार घातला आणि बाबासाहेबांना म्हणाले, तुम्ही मला मंत्रीमंडळात घेतले, मी तुमचा आभारी आहे, तुमच्या विश्वासाला मी पात्र राहिन. विलासरावांचे हे वाक्य तोडतच बाबासाहेब म्हणाले, मी नाही, मी नाही केल तुला मंत्री, इंदिरा गांधींनी डायरेक्ट तुझे नाव फायनल केले आहे. माझा काहीही वाटा नाही. कसं दिले हे त्यांनाच माहित पण मी नाही केलेलं.

बाबासाहेबांनी कोणतही श्रेय न घेता, प्रामाणिकपणे आपला यात काहीही वाटा नसल्याचे मान्य केले. विलासरावांनाही ही गोष्ट बरीच भावली होती. उल्हास पवार सांगतात, बाहेर येवून विलासराव मला म्हणाले, या माणसाकडून मी ही गोष्ट शिकलो दादा. लोकशाहीमध्ये लोक खोट श्रेय घेतात. पण या माणसाला सहज श्रेय घेता येत असूनही त्यांनी प्रामाणिकपणे ते नाकारले. हा माणूस आता माझ्या मनातुन उतरु शकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT