Manohar parrikar-babush monserrate- Utpal parrikar  sarkarnama
विशेष

मनोहर पर्रीकरांची सत्ता घालवणाऱ्या मोन्सरोतांनी त्यांच्या मुलालाही धूळ चारली!

Goa Assembly Election | 2005 मध्ये मोन्सेरात यांनी पर्रिकरांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि पर्रीकर सरकार कोसळले.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपने दणदणीत विजय मिळवला. गोव्यात झालेल्या निवडणूक प्रक्रियेत चर्चेत राहिलेली लढत म्हणजे बाबुश मोन्सेरात आणि अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांची.भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकरांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. उत्पल यांच्या बंडखोरीमुळे त्यांच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्या लढतीकडे लागले होते.

पणजी हा बाबुश मोन्सेरात यांचा बालेकिल्ला मानला जातो. विशेष म्हणजे गोव्याच्या राजकीय इतिहासात बाबुश यांचे राजकारण रंजक आणि न कळण्यापलीकडचे राहिले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पणजीची जागा जिंकून देणाऱ्या बाबूश मोन्सेरात यांच्यामुळेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी मुख्यमंत्रीपद आणि भाजपने सत्ता गमावली होती.

कोण आहेत बाबुश मोन्सेरात

गोव्यात अंतान्सिओ उर्फ बाबुश मोन्सेरात हे एक बडी आसामी म्हणून ओळखले जातात. 2002 मध्ये कॉंग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पक्षात प्रवेश केला. युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिकमध्ये असतानाच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. ताळगाव, पणजी आणि सांताक्रूझ या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची किमया बाबुश यांनी करुन दाखवली आहे. त्यामुळे पणजी आणि आजूबाजूच्या मतदारसंघात बाबुश यांची प्रचंड लोकप्रियता आहे.

याच पार्श्वभुमीवर बाबुश यांच्यासारख्या तगड्या उमेदावाराला डावलून उत्पल यांना पणजीतून उमेदवारी देण्याची शक्यता फारच कमी असणार, असं मत अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल होतं. जे आजच्या निकालं खरंही झाल्याचंही सगळ्यांनीच पाहिलं. बाबुश मोन्सेरात यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पक्षातअसताना लढवलेल्या निवडणूकीत 2 हजार मतांनी विजय मिळवला होता.

2002 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपने 17 जागांवर विजय मिळवला होता. सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना तीन जागांची गरज होती. यावेळी बाबुश मोन्सेरात आणि त्यांच्या दोन उमेदवारांच्या पाठिंब्यांने भाजपने गोव्यात सत्ता स्थापन केली. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले. पण पर्रीकर सरकार फार काळ टिकू शकले नाही. 2005 मध्ये मोन्सेरात यांनी पर्रिकरांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि पर्रीकर सरकार कोसळले. पर्रीकरांची साथ सोडून मोन्सेरात यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि गोव्यात प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले. कॉंग्रेस सरकारमध्ये त्यांच्या सरकारमध्ये मोन्सेरात हे मंत्रीही राहिले आहेत. पण आजही पर्रीकर सरकार पाडण्यासाठी बाबुश मोन्सेरात यांनाच जबाबदार ठरवले जाते.

इतकेच नव्हे तर बाबूश यांनी एकेकाळी पणजी पोलिस स्थानकावर हल्लाही केला होता.बलात्कारासारख्या गंभीर आरोपांखाली त्यांनी तुरंगात शिक्षाही भोगली आहे. तसेच ताळगाव आयटी हबविरोधात त्यांनी तीव्र आंदोलनामुळेही ते चांगलेच चर्चेत आले होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT