Sharad Pawar-Eknath Shinde
Sharad Pawar-Eknath Shinde Sarkarnama
विशेष

पवार-शिंदे भेटीत भविष्यातील मोठं रहस्य दडलंय; ती वेगळं काहीतरी देणार : राष्ट्रवादी नेत्याचा बॉम्बगोळा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिर्डीतील (Shirdi) अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज दुपारी साडेबारा किंवा अडीच वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे शिबिराला संबोधित करायला येणार आहेत. अधिवेशनात मार्गदर्शन करून ते पुन्हा ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल होतील, अशी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्यामुळे शुक्रवारी (ता. ४ नोव्हेंबर) दिवसभर माध्यमांत जी चर्चा होती. पवार यांची भेट आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेषतः राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनाबाबत केलेले स्टेटमेंट यातच भविष्यातील फार मोठं रहस्य दडलेले आहे. पवार-शिंदे भेट भविष्यात वेगळं काहीतरी देऊन जाईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. (Big secret behind Sharad Pawar-Eknath Shinde meeting: MLA Amol Mitkari)

मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी शरद पवार यांची ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्या भेटीनंतर शिंदे यांनी पवारांचे आरोग्य आणि राष्ट्रवादीच्या शिबिराबाबत भाष्य केले. त्यावर आमदार मिटकरी यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की आज ज्येष्ठ नेते शरद पवार आज दुपारी येतील आणि आम्हाला मार्गदर्शन करतील. आम्ही आज शिर्डीच्या साईबाबाकडे एकच मागणं मागितलं आहे. महाराष्ट्रातील बळिराजा सुखी व्हावा. ईडा पिडा टळावी आणि बळीचं राज्य पुन्हा एकदा या महाराष्ट्रात यावं, अशी विनंती आम्ही साईचरणी केली आहे.

एकनाथ शिंदे राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणार आहेत काय, यावर मिटकरी म्हणाले की, मी फक्त एवढंच म्हणाले की मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी ब्रीच कॅंडी रुग्णालयात पवारांना भेटायला गेले. रुग्णालयातून आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. ते उद्या राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या अधिवेशनाला जाणार आहेत आणि त्यानंतर नियमित उपचारासाठी ब्रीच कॅंडीला येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः दिली आहे. त्यामुळे शहाजी पाटील यांना काय वाटलं किंवा शिंदे गटात जी काही अस्वस्थता आहे. त्यावर एवढंच उत्तर देता येईल की, पवार-शिंदे भेट भविष्यात वेगळं काहीतरी देऊन जाईल, याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही.

शहाजी पाटील यांनी काल उलट्या पद्धतीने सांगितलं. फरक एवढाच आहे की, शिंदे गटातील अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. पुन्हा एकदा महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत मी बोलणे उचित नाही. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्याबाबत भाष्य करतील, असेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT